अडपल्लीला खड्ड्यांचा विळखा

By Admin | Updated: March 19, 2015 01:30 IST2015-03-19T01:30:57+5:302015-03-19T01:30:57+5:30

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोगावनजीकच्या अडपल्ली गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत.

Pinch of Pappas | अडपल्लीला खड्ड्यांचा विळखा

अडपल्लीला खड्ड्यांचा विळखा

गडचिरोली : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोगावनजीकच्या अडपल्ली गावातील सर्वच अंतर्गत रस्त्यावर जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात गावातील अंतर्गत रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असते. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. यासंदर्भात गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा रस्ता दुरूस्ती व नवीन रस्ता बांधकामाची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे संपूर्ण अडपल्ली गावातील रस्त्यांना खड्ड्यांचा विळखा पडला आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अडपल्ली गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गावातील काही नागरिक रस्त्याच्या कडेला शेणखताचे खड्डे खोदून त्या ठिकाणी कचरा टाकतात. त्यामुळे अर्ध्याअधिक मार्गावर शेणखताचे ढिगारे पसरलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास गडचिरोलीवरून अडपल्लीला जाणाऱ्या वाहनधारकांना व सायकलस्वारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राम पंचायत प्रशासनाचा पंचायत समिती, जिल्हा परिषद व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा कमी पडत असल्यामुळे अडपल्ली गाव विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)

Web Title: Pinch of Pappas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.