पुलावर खांब लावले मात्र पथदिव्यांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST2020-10-12T05:00:00+5:302020-10-12T05:00:20+5:30

सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाचे बांधकाम झाल्याबरोबर रस्ता व पुलाच्या दोन्ही बाजूला पथदिव्यांसाठी खांब उभारले आहेत. या पथदिव्यांना वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीची परवानगी असणे आवश्यक आहे.

Pillars were erected on the bridge but no street lights were found | पुलावर खांब लावले मात्र पथदिव्यांचा पत्ता नाही

पुलावर खांब लावले मात्र पथदिव्यांचा पत्ता नाही

ठळक मुद्देप्राणहिता नदीवरील पूल : सिरोंचा नगर पंचायतीकडून दिरंगाई, दोन वर्षांचा कालावधी उलटला

कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : प्राणहिता नदीवर बांधलेल्या पुलावर पथदिवे लावण्यासाठी पूल बांधणाऱ्या कंपनीने दोन वर्षांपूर्वीच वीज खांब उभारले आहेत. मात्र पथदिवे लावण्यासाठी सिरोंचा नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने विद्युत पुरवठा मिळू शकला नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून केवळ खांबच पुलाची शोभा वाढवत आहेत.
सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाचे बांधकाम झाल्याबरोबर रस्ता व पुलाच्या दोन्ही बाजूला पथदिव्यांसाठी खांब उभारले आहेत. या पथदिव्यांना वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र नगर पंचायतीने दिले नाही. त्यामुळे पथदिवे लावण्यात आले नाही. पथदिव्यांमुळे सिरोंचा शहरातील नागरिकांसाठी सोयीचे झाले असते. त्याचबरोबर या पुलाचे सौंदर्य पथदिव्यांमुळे वाढण्यास मदत झाली असती. विशेष म्हणजे पुलाची निर्मिती झाल्यापासून तीन वर्षांपर्यंत देखभाल व दुरूस्तीचे काम कंपनीकडे आहे. त्यामुळे तीन वर्षांचे वीज बिल व इतर खर्च कंपनी भरणार आहे. तसे नगर पंचायतीला कळविले आहे. मात्र नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने पुढची प्रक्रिया रखडली आहे.

सिरोंचा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारीपदी आपण नुकतेच रूजू झालो आहोत. त्यामुळे हे प्रकरण आपल्याला माहित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगर पंचायतीत आपली भेट घ्यावी. त्यांना तत्काळ नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल.
- विश्वास पाटील,
मुख्याधिकारी, सिरोंचा

Web Title: Pillars were erected on the bridge but no street lights were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.