शारीरिक शोषण करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:40 IST2016-12-25T01:40:19+5:302016-12-25T01:40:19+5:30
गावातीलच एका युवतीशी प्रेम संबंध स्थापन करून मागील वर्षभरापासून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी

शारीरिक शोषण करणाऱ्यास अटक
जीवनगट्टातील घटना : पीडित युवतीची एटापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार
एटापल्ली : गावातीलच एका युवतीशी प्रेम संबंध स्थापन करून मागील वर्षभरापासून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. संतोष नरोटे (२४) रा. जीवनगट्टा असे अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे.
संतोष नरोटे याचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून नरोटे याने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र लग्न करून तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याने सदर पीडित युवतीने थेट एटापल्ली पोलीस ठाणे गाठले व येथे संतोष नरोटे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी आरोपी संतोष नरोटे याच्यावर भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अटकही केली. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्लीचे पोलीस निरिक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक माधव इंगळे करीत आहे. आरोपीला रविवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गावातील काही लोकांनी पुढाकार घेऊन सदर प्रकरण मिटविण्याचे यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र युवकाच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याने प्रकरण पोलिसांकडे गेले.