ऐतिहासिक स्थळांचे ‘दर्शन’
By Admin | Updated: July 7, 2014 23:35 IST2014-07-07T23:35:52+5:302014-07-07T23:35:52+5:30
राज्यात मागास आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या तसेच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित

ऐतिहासिक स्थळांचे ‘दर्शन’
गडचिरोली : राज्यात मागास आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या तसेच नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गडचिरोली पोलिसांच्यावतीने आयोजित ‘महाराष्ट्र दर्शन सहल’ या अभिनव उपक्रमातून प्रगत महाराष्ट्राचे दर्शन घडले. सहलीत विद्यार्थ्यांनी राज्यातील अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली.
२५ जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथील शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांना तसेच राज्यातील या ठिकाणी झालेली विविध विकास कामांना भेटी दिल्या. या सहलीमध्ये ३८ मुले व ४१ मुली अशा एकूण ७९ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विशेष करून या सहलीमध्ये नक्षल सदस्यांची नातेवाईक असलेली मुले व नक्षल्यांकडून मारल्या गेलेल्या परिवारातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधान भवन, मंत्रालय, गृहमंत्र्यांचे कार्यालय, गेट वे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, नेहरू तारांगण, गिरगाव चौपाटी, वांद्र्रे-वरळी सी-लिंक, हाजी अली दर्गा येथे भेटी दिल्या. तसेच मुंबई येथे नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेने वर्सोवा ते अंधेरी दरम्यान प्रवास केला. पुणे भेटी दरम्यान कात्रज सर्पोद्यान, सारसबाग, शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड, खडकवासला, आयटी पार्क मधील इन्फोसिस कंपनीला भेट दिली. औरंगाबाद येथे पानचक्की, बिवी का मकबरा, देवगिरी, म्हैसमाळ, अजिंठा-वेरूळ लेणी, नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, आकाशवाणी केंद्र्र, डॉ. सी. व्ही. रमण विज्ञान केंद्र, चिल्ड्रेन ट्राफीक पार्क, क्रेझी केसल वॉटर पार्क या ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर पाडून पर्यटनाचा आनंद लुुटला. नागपूर येथील अपारंपरिक प्रशिक्षण अभियान केंद्रात सहलीचा समारोप झाला.
(शहर प्रतिनिधी)