शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

तेंदूच्या पानांप्रमाणे मोजल्या लाचेच्या नोटा.. बीडीओ फरार, पेसा समन्वयक जाळ्यात

By संजय तिपाले | Updated: August 26, 2023 13:22 IST

अहेरीत 'एसीबी'ची कारवाई: खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारले एक लाख ३० हजार 

गडचिरोली : तेंदूपत्ता युनिटचा लिलावात समावेश करुन वाहतुकीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी व तालुका पेसा समन्वयक यांनी खासगी व्यक्तीमार्फत व्यापाऱ्याकडून एक लाख ३० हजार रुपयांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने खासगी व्यक्तीला रंगेहाथ पकडून तालुका पेसा समन्वयकाला ताब्यात घेतले.  गटविकास अधिकारी फरार आहे. २५ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अहेरी येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान तेंदूंच्या पानांप्रमाणे अधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम मोजली. तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) संजीव येल्ला कोठारी (वय ४२) व खासगी व्यक्ती अनिल बुधाजी गोवर्धन (वय ३०, रा.व्यंकटापूर ता. अहेरी) अशी अटकेतील दोघांची नावे आहे तर गटविकास अधिकारी प्रतीक दिवाकर चन्नवार हा फरार आहे. चन्नवार हा अहेरीत प्रभारी गटविकास अधिकारी आहे. तकारदार यांचे तेंदुपत्ता युनिट आहे. ते युनिट लिलावात घेऊन सदर तेंदुपत्त्याच्या वाहतूक परवान्याकरीता त्यांना गट विकास अधिकारी यांच्या नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते  देण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी या दोघांनी एक लाख ३० हजार रुपयांची मागणी केली.

तक्रारदाराने गटचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून तक्रार केली. त्यानंतर उपअधीक्षक  अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक  श्रीधर भोसले यांनी लाच मागणी पडताळणी केली. यात  सन २०२२ यावर्षी  तेंदुपत्ता युनिट लिलावात घेऊन सदर तेंदूपत्त्याच्या वाहतूक परवान्याकरीता त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दोघांनी पंचांसमक्ष लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अहेरी ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला.  पो.नि. शिवाजी राठोड, हवालदार नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, किशोर जोजारकर, पोलिस शिपाई संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रफुल्ल डोलीकर यांचा कारवाईत सहभाग होता.

गटविकास अधिकाऱ्याचा शोध सुरु

लाचेची १ लाख ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना  २५ ऑगस्टला खासगी व्यक्ती अनिल गोवर्धन यास अहेरीत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यानंतर तालुका समन्वयक संजीव कोठारीला ताब्यात घेतले. कारवाईची कुणकुण लागताच गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार झाला असून त्याचा शोध सुरु असल्याचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणGadchiroliगडचिरोलीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग