अपंग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा

By Admin | Updated: September 4, 2016 01:50 IST2016-09-04T01:50:49+5:302016-09-04T01:50:49+5:30

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून कानपूर येथील एलीमको कंपनीने

Persons with disabilities should take advantage of the camp | अपंग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा

अपंग व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा

गुरूवारी महास्वावलंबन शिबिर : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नातून कानपूर येथील एलीमको कंपनीने अल्पउत्पन्न गटातील अपंग व्यक्तींना आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यासाठी मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात १५ सप्टेंबर रोजी गुरूवारला महास्वावलंबन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त अपंग व्यक्तींनी लाभ घ्यावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले आहे.
अपंगांचे शिबिर आयोजित करण्याबाबतच्या नियोजनासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवणे, जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विलास मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एन. जे. आत्राम आदी उपस्थित होते. १५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या अपंगांच्या महास्वावलंबन शिबिरात ४० टक्के अपंगत्व असलेल्या अपंगांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलले आहे.
कानपूर येथील एलीमको कंपनीचे पथकाद्वारे अपंगाच्या हातापायाची तपासणी करून अहवालानुसार दोन महिन्यांनी व्हिलचेअर सायकल आदी साहित्य विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या साहित्याचा लाभ घेण्यासाठी शिबिरात येताना अपंगांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबूक, निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा सोबत ठेवणे आवश्यक आहेत. याशिवाय दोन पासपोर्ट अपंग व्यक्तींनी सोबत आणावे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी बैठकीत दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Persons with disabilities should take advantage of the camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.