परवानगी एकीकडची, झाडे तोडली दुसरीकडची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:54+5:30
यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या उपयोगासाठी शेतमालक शामराव जांभुळकर यांना पट्ट्याद्वारे वाटपात दिली. त्यात ४५ सागाची झाडे असून त्यावर सरकारची मालकी असल्याची स्पष्ट नोंद आहे.

परवानगी एकीकडची, झाडे तोडली दुसरीकडची
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मौजा नरचुली येथे वनजमिनीचा पट्टा मिळालेल्या शेतात असलेल्या सागवानाच्या झाडांचा परवाना काढून लगतच्या राखीव वनातील काही झाडांची कटाई करून परस्पर हैदराबादला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शेतकऱ्याला हाताशी धरून कंत्राटदाराने केला असून वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून त्याकडे हेतुपूरस्सर डोळेझाकपणा केला जात असल्याचा आरोप नरचुलीचे सरपंच संदीप भेवर आणि एस.डब्ल्यू.कोल्हे यांनी केला आहे.
यासंदर्भात वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारीत या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात नमुद केल्यानुसार जुना खसरा नं.४६ ची आराजी १.१९ हेक्टर शासनाची जमीन होती. देसाईगंजच्या महसूल अधिकाऱ्यांनी ती जमीन मामला क्र.५३ एनलएनडी १९७४-७५ अन्वये शेतीच्या उपयोगासाठी शेतमालक शामराव जांभुळकर यांना पट्ट्याद्वारे वाटपात दिली. त्यात ४५ सागाची झाडे असून त्यावर सरकारची मालकी असल्याची स्पष्ट नोंद आहे. गावाच्या पुनर्मोजणीतही सदर सागवाच्या झाडांवर सरकारची मालकी असल्यो नमूद आहे. त्या खसरा नंबर, गट नंबरला लागून पूर्वेस, उत्तरेस आणि दक्षिणेस वनखात्याचे संरक्षित मोठ्या झाडांचे जंगल आहे. दरम्यान कंत्राटदारान शेतमालकाचे मुलाला हाताशी धरून आरमोरीचे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअरसोबत हातमिळवणी करून कच्चा रस्ता खसरा नं.जुना ४६ मध्ये दर्शविला आहे. त्यात पश्चिमेकडील जमीन कमी करून त्याऐवजी वनखात्याची मोठी झाडे असलेले अंदाजे ०.४० आर क्षेत्र दिलीप शामराव जांभुळकर यांच्या नावाने नकाशात टाकून जागा मोजणीचा चुकीचा नकाशा दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. हा प्रकार कंत्राटदार मोहन सोनटक्के यांच्या पुढाकाराने झाल्याचा ठपका तक्रारर्त्यांनी ठेवला आहे.
चुकीच्या नकाशाच्या आधारे वन सर्व्हेक्षक माडुरवार यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी करून सिमेवरील झाडांना हॅमर मारून शेतमालकाच्या जमिनीची चुकीची हद्द ११ मार्च २०१९ ला कायम केली. त्यात मोठ्या झाडांच्या जंगलाचे गट नं.७३ झाडांचे क्षेत्र शेतकºयाच्या नावे दाखविले. दरम्यान उपलब्ध अधिकार अभिलेख पंजीत ४५ सागवानी झाडांवर सरकारची मालकी आहे व तलाठ्याचे प्रतिवेदन पट्ट्याने दिल्याबाबतची नोंद असताना सुद्धा ५१ साग व ३ बिजा झाडांच्या तोडाईस ८ एप्रिल २०१९ रोजी दिलेली परवानगी बेकायदेशिर ठरत आहे. यात सहायक वनसंरक्षक व्ही.जी.साबळे यांनी ठेकेदाराशी हातमिळवणी केल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात चुकीची झाडे तोडून शासनाचे १५ लाख रुपयांचे नुकसान केले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कापलेली झाडे शेतकऱ्याच्या मालकीची आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाच्या नोंदीनुसार त्यावर शेतकºयाचा अधिकार आहे. त्याची तपासणी करूनच शेतकऱ्याला लाकडांच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली.
- व्ही.जी.साबळे,
सहायक वनसंरक्षक