२९३ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
By Admin | Updated: July 1, 2017 01:29 IST2017-07-01T01:28:50+5:302017-07-01T01:29:35+5:30
जि.प. आरोग्य विभागातील विविध संवर्गातील २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती निकाली काढल्याबद्दल

२९३ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती
आरोग्य संघटनेद्वारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जि.प. आरोग्य विभागातील विविध संवर्गातील २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती निकाली काढल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.
आरोग्य विभागातील २०४ आरोग्य सेवकांपैकी १३०, ५० आरोग्य सेवकांपैकी ३९, ३७ आरोग्य सेवकांपैकी ३३, ३० प्रयोग शाळा तंत्रज्ञांपैकी २९, महिला आरोग्य सेविका ६१ असे एकूण २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती निकाली काढल्यामुळे संघटनेच्या वतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, माता बाल संगोपन अधिकारी शंभरकर, प्रशासन अधिकारी उके, लिपीक बाळराजे, चिट्टावार यांचे आभार मानून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच कर्मचाऱ्यांची कालबद्ध, स्थायी, वैद्यकीय प्रतिपूर्ती, रजा प्रकरणे तत्काळ निकाली काढावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी उर्वरित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले. निकाली निघालेल्या प्रकरणांची नोंद सेवा पुस्तकात घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ सहायकांचा आढावा मासिक सभेत घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, महिला अध्यक्ष नीलू वानखेडे, कोषाध्यक्ष अनिल मंगर, कार्याध्यक्ष आशानंद सहारे, सचिव विनोद सोनकुसरे, डी. टी. आंबाने, जी. वाय. पाल, व्ही. ए. फुलझेले, मोहन भुरसे, टी. एस. कल्लुरी, चंद्रकांत चहारे, पेंदाम, आर. व्ही. सोनटक्के, आनंद मोडक, एन. बसवा, फारूख पठाण, एस. जी. सय्यद, अनिता राठोड, उषा चौधरी, जी. एस. हेडो, श्यामला नागुला, बोरगमवार, के. एस. रंगुवार, गोपी बंडावार, राजू आत्राम, एस. एन. राजगडे, डी. एन. सहारे, एम. हुलके, गेडाम, अल्लीवार, अकबर पठाण, रणदिवे, आर. बी. आखाडे, मालती शेडमाके, कावळे, पायाळ, हिचामी, भांडारकर, सातपुते, भटारकर, सहारे, सातपुते, वडधे, काटलाम, कोंडावार, अल्लीवार, फारूख शेख, गडमवार, मडावी, चलाख, लडके, जालिंद्र रायपुरे, गजभिये उपस्थित होते.