मानापुरात आदिवासींचा जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 01:26 IST2016-01-11T01:26:03+5:302016-01-11T01:26:03+5:30
आदिवासी समाजाच्या वतीने मानापूर येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले.

मानापुरात आदिवासींचा जनसागर
गोंडी नृत्य व विविध कार्यक्रम : बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण
मानापूर/देलनवाडी : आदिवासी समाजाच्या वतीने मानापूर येथे क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी गोंडी नृत्य व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी होते. यावेळी उद्घाटन माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दौलत धुर्वे, प्राचार्य डी. के. मेश्राम, दामोधर वट्टी, प्रा. उसेंडी, माजी सभापती बगुजी ताडाम, डी. डी. मैंद, चौके, पांडुरंग गुरनुले, हस्तक, भाईचंद गुरनुले, सरपंच धनिराम कुमरे, सरपंच माणिक पेंदाम, पोलीस पाटील मोहुर्ले, नामदेव मोरघडे, धुर्वे, काशिनाथ टेकाम, नरेंद्र टेंभुर्णे, चिंतामण ढवळे, टेकाम, कोल्हे, बिडवाईकर, आलाम, पेंदाम, वरखडे आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दलित, आदिवासी व मागासवर्गीयांसाठी संविधानात विशेष तरतूद केली. त्यामुळे आदिवासी व दलित समाजाला सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक नागरिकाला आपली संस्कृती जोपासण्याचा अधिकार मिळाला असल्याने प्रत्येकाने आपली संस्कृती जोपासावी, असे आवाहन डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.
संचालन दिलीप कुमरे तर आभार तुकाराम वैरकर यांनी मानले.