जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:22+5:30

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मदत द्यावी तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली.

The people of the district requests Chief Minister | जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडे

ठळक मुद्देआमदारांनी मांडला सिंचनाचा मुद्दा : खासदारांनी वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनसह उद्योग निर्मितीकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अविकसित, उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी, गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे साकडे खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्ह्यातील भाजपच्या दोनही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घातले.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. खा.अशोक नेते यांनी त्यांच्याशी बराचवेळ चर्चा करून जिल्ह्यातील अडीअडचणी सांगितल्या. परतीचा पाऊस व अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मदत द्यावी तसेच गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी केली. याशिवाय निवेदनात कृषी, उद्योग, दूरसंचार सेवा, पर्यटन, वडसा-गडचिरोली रेल्वे लाईन आदीसह विविध मागण्यांचा समावेश आहे. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यात आले. अतिक्रमीत वनजमिनीला स्थायी पट्टे देण्यात यावे, सूरजागड प्रकल्प सुरू करून खनन व सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावावा. महावितरणचे वीज बिल न भरल्यामुळे बऱ्याच भागातील दूरसंचार सेवा खंडित झाली आहे. परिणामी भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. थकीत वीज बिल भरण्याची कार्यवाही करावी. मार्र्कं डादेव येथे महाशिवरात्रीला भरणाºया यात्रेसाठी सोयीसुविधा पुरवाव्यात, तसेच मंदिर दुरूस्तीचे काम लवकर पूर्ण करावे, वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनकरिता वनजमिनीचे भूसंपादन जलदगतीने करावे. सर्व केंद्रावर बारदाण्याची सुविधा करावी. किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी करावी. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात निरूपयोगी असलेले गाळे व जागा सुशिक्षित बेरोजगारांना द्यावे, घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसाठी वनजमीन संपादन करावे. गडचिरोली शहरात वनोेद्यानाची निर्मिती करावी, गोकूलनगरलगतच्या तलावाचे सौंदर्यीकरण करावे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा. कठाणी नदीवरील जुन्या पुलाचे बंधाºयामध्ये रूपांतर करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याची मागणी
गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून होणाऱ्या कामाचे भूमिपूजन व काम पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करावे परंतु निधी नसल्याच्या कारणावरून मंजूर झालेले कोणतेही काम रद्द करू नये, अशी मागणी आ.डॉ.देवराव होळी यांनी मुख्यमंत्र्यांना केली. याशिवाय कोटगल, बॅरेज, तळोधी उपसा सिंचन, राजीव गांधी उपसा सिंचन, कोटगल उपसा सिंचन योजनेची कामे पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. कोनसरी येथे पोलाद निर्मिती कारखाना सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, प्रत्येक शेतकऱ्यांना दोन गायी, दोन म्हशी, दोन शेळ्या देऊन जोधंद्यास प्रोत्साहित करावे. मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून एमआयडी अंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावे, अशी मागणी डॉ.होळी यांनी केली.
आरमोरीचे आ.कृष्णा गजबे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. विशेष बाब म्हणून विकासात गडचिरोली जिल्ह्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

Web Title: The people of the district requests Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.