शहरं
Join us  
Trending Stories
1
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
2
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
3
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
4
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
5
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
6
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
7
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
8
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
9
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
10
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
11
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
12
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
13
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
14
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
15
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
16
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
17
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
18
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
19
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
20
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित

By admin | Updated: June 20, 2015 02:13 IST

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अहेरी : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी अनुदानित आश्रमशाळा संघटनेच्या वतीने अहेरीचे प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
एकाच वेळी एवढी मोठी रक्कम अदा करणे अशक्य असल्यामुळे शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. सदर मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. परंतु वेतनाविना कर्मचाऱ्याची आर्थिक अडचण लक्षात घेता, पुन्हा वेतन निश्चिती व वसुली करणे अडचणीचे व अन्यायकारक असल्याने सुधारित एकस्तर वेतन निश्चिती प्रकरण निकाली लागेपर्यंत वेतन वसुली थांबविण्यात यावी व प्रलंबित वेतन तत्काळ अदा करावे, अशी मागणी संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव बासनकर यांनी केली.
प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी मागण्या लक्षात घेऊन वेतन देयके पूर्वीप्रमाणेच सादर करण्याची मुख्याध्यापकांना आदेशित करून प्रलंबित वेतन अदा करण्याचे मान्य केले. यावेळी प्रकल्प कार्यालय भामरागड येथील सहायक प्रकल्प अधिकारी विलास राचेलवार, लेखाधिकारी वाळूजकर, संघटनेचे विलास सोमनकर, सुधाकर शेंडे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांवर वेतन वसुलीचे गंडांतर
आदिवासी विकास विभागांतर्गत गडचिरोली, अहेरी व भामरागड येथील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांना देय असलेल्या एकस्तर वेतनश्रेणी व गे्रड वेतनात एकसूत्रता नसल्याने कर्मचारी कमी अधिक प्रमाणात वेतनाची उचल करीत आहेत. आश्रमशाळेतील शिक्षकांना मागील दोन वर्षांपूर्वी सुधारित एकस्तर वेतनश्रेणी व गे्रड वेतन लागू करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांनी जवळपास चार ते पाच लाख रूपयांचा अतिरिक्त रकमेची उचल केली. कालांतराने लागू केलेली सुधारित एकस्तर वेतनश्रेणी ही सदोष असल्याचे प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्या अनुषंगाने शिक्षकांनी उचल केलेल्या पूर्ण रकमेची वसुली झाल्याशिवाय व पूर्ववत एकस्तर वेतन निश्चिती केल्याशिवाय वेतन देता येणार नाही, असे प्रकल्पाच्या वतीने आदेशित करण्यात आले. त्यामुळे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे.