पक्षकार अनुपस्थित राहिल्याने प्रकरणे प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 01:51 IST2016-04-21T01:51:38+5:302016-04-21T01:51:38+5:30
विधी सेवा प्राधिकरण चामोर्शीच्या वतीने फिरत्या लोकअदालतीचे आयोजन आष्टी येथील ग्राम पंचायत सभागृहात बुधवारी करण्यात आले.

पक्षकार अनुपस्थित राहिल्याने प्रकरणे प्रलंबित
ग्राम पंचायतीत आयोजन : आष्टीत लोकअदालत
आष्टी : विधी सेवा प्राधिकरण चामोर्शीच्या वतीने फिरत्या लोकअदालतीचे आयोजन आष्टी येथील ग्राम पंचायत सभागृहात बुधवारी करण्यात आले. मात्र लोक अदालतील पक्षकार अनुपस्थित राहिल्याने सहा प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली.
लोकअदालतीला न्यायाधीश म्हणून आर. व्ही. म्हशाखेत्री तसेच पॅनलमध्ये चामोर्शीचे अधिवक्ता एम. डी. सहारे, सामाजिक कार्यकर्त्या भारती उपाध्ये, आष्टीच्या सरपंच वर्षा देशमुख, ग्रामविकास अधिकारी बी. डी. चौधरी उपस्थित होते. लोकअदालतीत एकूण सहा प्रकरणे मांडण्यात आली. परंतु पक्षकार उपस्थित न झाल्याने लोकअदालतीतील प्रकरणाचा निकाल घोषित करण्यात आला नाही. दरवर्षी लोकअदालतीचे आयोजन केले जाते. याप्रसंगी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ यावर न्यायाधीश आर. बी. म्हशाखेत्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अधिवक्ता सहारे यांनी हुंडाबळीसंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती उपाध्ये यांनी केले. लोकअदालतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. संचालन व आभार पुणेकर यांनी केले. वर्षातून एकदा लोकअदालतीचे आयोजन प्रत्येक न्यायालयात करण्यात येते. नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातात.(प्रतिनिधी)