वैरागडच्या सरपंचपदी पेंदाम तर भास्कर बोडणे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST2021-02-17T04:43:09+5:302021-02-17T04:43:09+5:30
वैरागड : आरमोरी तालुक्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या वैरागड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता पेंदाम तर उपसरपंच म्हणून भास्कर बोडणे यांची ...

वैरागडच्या सरपंचपदी पेंदाम तर भास्कर बोडणे उपसरपंच
वैरागड : आरमोरी तालुक्यात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या वैरागड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता पेंदाम तर उपसरपंच म्हणून भास्कर बोडणे यांची निवड झाली. सरपंच पदासाठी संगीता पेंदाम व गौरी सोमनानी यांनी नामांकन अर्ज दाखल केले हाेते. संगीता पेंदाम यांच्या बाजूने भास्कर बोडणे, संगीता मेश्राम, सत्यदास आत्राम, प्रतिमा बनकर, छानू मानकर, मनीषा खरवडे, रेखा भैसारे आदी आठ सदस्यांनी मतदान केले. उपसरपंच पदासाठी भास्कर बोडणे यांच्या बाजूने देखील आठ मते पडली. या निवडणुकीत भाजप व काँग्रेस समर्थक उमेदवार एकत्र आले होते. विजयी पदाधिकाऱ्यांनी निवडीचे श्रेय भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा परिषद सदस्य संपत आडे, भाग्यवान टेकाम यांना दिले. निवडीबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य केशव गेडाम, माजी समाजकल्याण सभापती विश्वास भोवते, दत्तू सोमनकर, विजय गुरुनुले, बालाजी पाेफळी, रमेश बोडणे, महादेव दुमाने, अविनाश खरवडे, खुशाल पेंदाम, संजय भैसारे, विनोद बनकर, लालाजी आत्राम, सावजी धनकर यांनी आनंद व्यक्त केला.