गडचिराेलीतील दाेन मंगल कार्यालयांवर दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:38+5:302021-04-07T04:37:38+5:30
काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिराेली जिल्ह्यात काही निर्बंध जाहीर केले आहेत. यामध्ये लग्न समारंभात ५० ...

गडचिराेलीतील दाेन मंगल कार्यालयांवर दंड
काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिराेली जिल्ह्यात काही निर्बंध जाहीर केले आहेत. यामध्ये लग्न समारंभात ५० व्यक्तींपेक्षा अधिकच्या उपस्थितीवर बंदी घातली आहे. सर्व वऱ्हाड्यांनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक केले आहे. ५ एप्रिल राेजी सुप्रभात व सुमानंद सभागृहात लग्न समारंभाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या लग्नात ५० पेक्षा अधिक व्यक्ती हाेते. अनेकांनी मास्क परिधान केला नव्हता, तसेच सामाजिक अंतरही पाळले नसल्याची बाब नगर परिषदेच्या पथकाने भेट दिली असता दिसून आली. दाेन्ही सभागृहांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहाेळ यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेचे स्नेहल शेंदरे, वैभव कागदेलवार, शरद मार्तीवार, गुरू बाळेकरमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.