पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले

By Admin | Updated: December 22, 2015 01:34 IST2015-12-22T01:34:57+5:302015-12-22T01:34:57+5:30

सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय

Pedestrians attacked the District Collector | पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले

पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले

गडचिरोली : सूरजागड लोहप्रकल्प एटापल्ली परिसरातच उभारण्यात यावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्लीच्या संयुक्त विद्यमाने १३ डिसेंबरपासून सूरजागड येथून काढलेली संघर्ष पदयात्रा सोमवारी गडचिरोली शहरात पोहोचली. या पदयात्रेचे गडचिरोलीकरांनी स्वागत केले. खासदार अशोक नेते यांच्या घरासमोर दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पदयात्रेकरू जिल्हा कचेरीवर धडकले.
१३ डिसेंबरपासून सदर संघर्ष पदयात्रेला सूरजागड येथून प्रारंभ करण्यात आला. एटापल्ली, अहेरी, आलापल्ली, आष्टी, चामोर्शी, तळोधी मो., नवेगाव रै. येथून रविवारी सायंकाळी उशीरा गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थानात सूरजागड संघर्ष यात्रा पोहोचली.
येथून सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात पदयात्रा दाखल झाली. येथील राधे बिल्डींगच्या समोर गडचिरोलीच्या नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक-यादव, नगरसेविका बेबी चिचघरे, न.प. सभापती विजय गोरडवार, नगरसेविका मिनल चिमुरकर यांनी पदयात्रेकरूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व या संघर्ष पदयात्रेला पाठींबा दर्शविला.
यावेळी त्यांच्यासोबत नईमभाई शेख, गिरीष खाडीलकर, दिलीप चिकराम, सुनिल चिमुरकर, जयश्री चांदेकर, श्रीरंग उंदीरवाडे, अनिल कुनघाडकर, रामदास उंदीरवाडे आदी उपस्थित होते. त्यानंतर सदर पदयात्रा खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर पोहोचली. या ठिकाणी भाजपच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
येथून सदर पदयात्रा खासदार नेते यांच्या घरासमोर पोहोचली. या ठिकाणी पदयात्रेकरूंनी तब्बल दीड ते दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी पदयात्रेचे मुख्य आयोजक सुरेश बारसागडे यांनी या पदयात्रेचा उद्देश भाषणातून सांगितला.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, गजानन येनगंधलवार, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, अनिल करपे, प्रकाश अर्जुनवार, गोवर्धन चव्हाण, संजय बारापात्रे, डेडूजी राऊत, स्वप्नील वरघंटे, नामदेव गडपल्लीवार, विलास भांडेकर आदी उपस्थित होते.
ठिय्या आंदोलन आटोपल्यानंतर संघर्ष पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पोहोचली. अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांना मागण्यांचे निवेदन सादर केल्यानंतर सदर पदयात्रेची सांगता करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Pedestrians attacked the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.