वनविभागाच्या कचाट्यातून पर्लकोटाचा पूल मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:42+5:302021-01-09T04:30:42+5:30
दरवर्षी पावसाळ्यात पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरून हाहाकार माजतो. अनेक वेळा १०० वर गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे पर्लकोटा ...

वनविभागाच्या कचाट्यातून पर्लकोटाचा पूल मुक्त
दरवर्षी पावसाळ्यात पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरून हाहाकार माजतो. अनेक वेळा १०० वर गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे पर्लकोटा नदीवर नव्याने उंच पूल उभारणे गरजेचे होते. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे गेल्यामुळे त्या विभागाने अखेर हा पूल मंजूर केला. १.१० किलोमीटर लांबीच्या या पुलाची किंमत ७७.८९ कोटी रुपये आहे.
(बॉक्स)
ही होती वनविभागाची अडचण
दीड वर्षांपासून मंजूर असलेल्या या पुलाची लांबी २० मीटरने वाढली होती. त्यामुळे दोन्ही बाजुने रस्त्यांना योग्य पद्धतीने जोडण्यासाठी वनविभागाची काही जमीन घेणे आवश्यक होते. त्यासाठी रितसर प्रक्रिया करूनही वरिष्ठ स्तरावर अनेक महिन्यांपासून हे काम प्रलंबित होते. आता भामरागडकडील बाजूची परवानगी मिळाली असून हेमलकसाच्या बाजूकडील परवानगीही प्रक्रियेत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीने हे काम सुरू करण्यात आले.