पीक कर्जवसुली ७३ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:47 IST2018-03-22T22:47:06+5:302018-03-22T22:47:06+5:30
दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १५ हजार ३५२ सभासद शेतकºयांना ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले.

पीक कर्जवसुली ७३ टक्क्यांवर
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात एकूण १५ हजार ३५२ सभासद शेतकºयांना ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयाच्या पीक कर्जाचे वाटप केले. आतापर्यंत सदर बँकेने ११ हजार ३६० सभासद शेतकºयांकडून ३६ कोटी १६ लाख ९६ हजार ५१५ रूपयांच्या पीक कर्जाची वसुली केली आहे. पीक कर्ज वसुलीची टक्केवारी ७३.३२ आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५५ शाखा आहेत. सन २०१७-१८ च्या खरीप हंगामात जिल्हा बँकेने १५ हजार ३५२ शेततकºयांना सेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत एकूण ४९ कोटी ३३ लाख २१ हजार रूपयांचे पीक कर्ज वाटप केले. २० मार्चपर्यंत ११ हजार ३६० शेतकरी सभासदांनी ३६ कोटी १६ लाख रूपयांच्या पीक कर्जाचा भरणा केला. या शेतकºयांना महाराष्टÑ शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ मिळाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांच्या हाती अत्यल्प उत्पादन आले असले तरी जिल्ह्यातील शेतकºयांकडून कर्ज वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीक कर्जाचा भरणा करण्यासाठी २९ व ३० मार्चला जिल्हा बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार असल्याची माहिती बँकेच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. जिल्हा बँकेने कोरची तालुक्यातील ६०० शेतकºयांना १ कोटी ६१ लाख ५१ हजार, कुरखेडा तालुक्यातील २ हजार ३९ शेतकºयांना ६ कोटी ४० लाख २१ हजार, देसाईगंज तालुक्यातील ६२३ शेतकºयांना १ कोटी ९३ लाख ७१ हजार, धानोरा तालुक्यातील शेतकºयांना २ कोटी ८८ लाख ४४ हजार, आरमोरी तालुक्यातील शेतकºयांना ५ कोटी ३५ लाख ८२ हजार, गडचिरोली ५ कोटी ८० लाख व चामोर्शी तालुक्यात १६ कोटी २४ लाख रूपये पीक कर्ज वाटप केले.
वसुलीत कोरची, अहेरी तालुका आघाडीवर
२०१७-१८ च्या पीक कर्ज वसुलीत कोरची व अहेरी तालुक्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कोरची तालुक्यात जिल्हा बँकेने ७७.४३ टक्के तर अहेरी तालुक्यात ७७.१८ टक्के पीक कर्ज वसुली झाली आहे. कुरखेडा तालुका ७०.५५ टक्के, देसाईगंज ६५.८९, धानोरा ७४.०१, आरमोरी ६८.४८, गडचिरोली ७३.३६, चामोर्शी ७५.४७, मुलचेरा ७५.९७, भामरागड ७६.६९, एटापल्ली ७४.८४ तर सिरोंचा तालुक्यात ७१.७४ टक्के वसुली आहे
३१ मार्च २०१८ पर्यंत पीक कर्जाचा भरणा केलेल्या शेतकºयांना शुन्य टक्के व्याज दराचा लाभ मिळणार आहे. १ एप्रिलपासून पीक कर्ज वितरित करण्यात येणार आहे. सभासद शेतकºयांनी शुन्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा.
- सतीश आयलवार, सीईओ, जीडीसीसी बँक गडचिरोली