आरमोरीत निघाली शांतता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:39 AM2019-08-02T00:39:59+5:302019-08-02T00:40:57+5:30

पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर म्हणून आरमोरी शहरातून बुधवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पोलीस सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून रॅलीची सुरूवात झाली.

Peace rally kicks off | आरमोरीत निघाली शांतता रॅली

आरमोरीत निघाली शांतता रॅली

Next
ठळक मुद्देनक्षलवाद्यांविरोधात दिल्या घोषणा : शेकडो विद्यार्थी, शिक्षक व पोलिसांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर म्हणून आरमोरी शहरातून बुधवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पोलीस सहभागी झाले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून रॅलीची सुरूवात झाली. भगतसिंग चौक ते बाजारपेठ व मुख्य मार्गाने रॅली फिरविण्यात आली. रॅलीत पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे, चेतनसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब दुधाळ, शीतल राणे, शिक्षक हंसराज बडोले, पोलीस हवालदार अकबर पोयाम, वसंत जौंजाळकर, नरेश वासेकर, गोपाल जाधव, भजनराव दरवडे यांच्यासह आरमोरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरातून रॅली फिरवून भगतसिंग चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान नक्षलवाद विरोधी विविध घोषणा देण्यात आल्या. नक्षलवादामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास रखडला आहे. आपली दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलादी हिंसक कारवाया घडवून आणतात. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न दुमानता त्यांचा विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले. यशस्वीतेसाठी आरमोरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Peace rally kicks off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.