शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

३१ मार्चपूर्वी कर्ज भरा अन् व्याजमाफीचा लाभ घ्या ! सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:09 IST

Gadchiroli : मार्च महिना संपण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील बँकांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: मार्च महिना संपण्यास केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील बँकांमध्ये पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळत असल्याने शेतकरी इकडून तिकडून पैशांची जुळवाजुळव करत बँकांकडे धाव घेत आहेत.

शासनाच्या धोरणानुसार, ३१ मार्चपर्यंत कर्जाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजातून पूर्णतः माफी मिळते. हे बिनव्याजी कर्ज जवळपास नऊ ते दहा महिने वापरता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा पर्याय अत्यंत फायदेशीर ठरत आहे.

२३ हजार शेतकऱ्यांनी उचलला लाभ

मागील खरीप हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील २२ हजार ५०४ शेतकऱ्यांना सुमारे १२५ कोटी ४१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले होते. १८ मार्चपर्यंतच्या आकडेवारीनुसार, १४ हजार २५३ शेतकऱ्यांनी ७३ कोटी ५७लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. ही एकूण वाटपाच्या ५८.६६ टक्के वसुली असून, उर्वरित १२ दिवसांत यात मोठी वाढ होण्याची शक्यता बैंक प्रशासनाने वर्तवली आहे.

शेतकऱ्यांची धावाधाव सुरू, पण चुकारे रखडले !

अनेक शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत केंद्रांवर धानाची विक्री केली आहे. मात्र, अद्याप थानाचे चुकारे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. एकीकडे ३१ मार्चची मुदत जवळ आली आहे आणि दुसरीकडे हातात पैसे नाहीत, अशा कात्रीत शेतकरी सापडला आहे. व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी अनेक शेतकरी उसनवारी करून किंवा खासगी सावकारांकडून पैसे घेऊन बँकेचे कर्ज नील करत असल्याचे चित्र आहे.

सहकारी बँकेमार्फत सर्वाधिक वितरण

सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक थेट गावागावांत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांची खाती याच बँकेत असल्याने आणि सोप्या प्रक्रियेमुळे शेतकरी या बँकेलाच पहिली पसंती देतात.

बचत गटापेक्षा पीक कर्ज ठरतेय फायदेशीर

शेतकरी एप्रिल महिन्यात नवीन कर्जाची उचल करतात आणि त्याची परतफेड पुढील वर्षी मार्चमध्ये करतात. बचत गटाला व्याज भरून देण्यापेक्षा पीक कर्जाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

"३१ मार्चपूर्वी कर्जाचा भरणा केल्यास त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. शेतकऱ्यांना केवळ मुद्दल रक्कम भरायची असते. त्यामुळे व्याजाचा बोजा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज भरावे. नवीन कर्ज लवकरच दिले जाते."- सतीश आयलवार, सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pay Loan Before March 31st, Avail Interest Waiver!

Web Summary : Gadchiroli farmers rush to repay loans before March 31st to benefit from zero percent interest. Many are struggling due to delayed payments for sold paddy. The District Central Cooperative Bank is leading in loan distribution.
टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीMONEYपैसाGadchiroliगडचिरोली