शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

हमाली व कमिशनची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 5:00 AM

उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव, सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास दीड महिन्यापासून प्रत्येक केंद्रांवर १० हजार क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउपव्यवस्थापकांना निवेदन : कुरखेडा तालुक्यातील १० संस्थांनी केली सामूहिकपणे खरेदी बंद

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी प्रक्रियेत आविका संस्थाना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० संस्थांनी सोमवारपासून सामूहिकपणे धान खरेदी बंद करण्यात आली. व याबाबत मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले.उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव, सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास दीड महिन्यापासून प्रत्येक केंद्रांवर १० हजार क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र आदिवासी महामंडळाचा असहकार्य व खरेदी प्रक्रीया संदर्भात उदासीन धोरणामुळे आविका खरेदी संस्था अडचणीत सापडलेल्या आहेत. अनेक संस्थाची खरेदी ही खुल्या ओट्यावर होते व त्यांची जवळपास पूर्ण झालेली आहे. मात्र महामंडळाकडून धानाची उचल करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार हमाली व कमिशनची व्यवस्था करणे ही अभिकर्ता म्हणून महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र अद्याप हमाली व कमिशनची रक्कम संस्थाना प्राप्त झालेली नाही, असे संस्थांनी निवेदनात म्हटले आहे.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धानाचे चुकारे थकले असल्याने शेतकऱ्यांचा रोष संस्थाना सोसावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाचा फटकासुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रांना बसत आहे. मात्र पुरेशा प्रमाणात ताळपत्र्यांचा पुरवठा संस्थाना करण्यात आलेला नाही. अशावेळी धान खराब झाल्यास दीडपट वसूलीचे पत्र संस्थाना महामंडळाकडून देण्यात येते. अशा धोरणाविरोधात संतप्त होत सोमवारपासून येथील सर्व आविका संस्थानी सामूहिक काटा बंद आंदोलन पुकारत खरेदी थांबविलेली आहे. त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान व अडचणीस आविका संस्था जबाबदार राहणार नाही, असे उपविभागिय अधिकारी व तहसीलदार कुरखेडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.आविका संस्थेच्या मागण्या निकाली काढाव्या, अशी मागणी आविका संस्था कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव तलमले, सचिव हेमंत शेंदरे, सुधाकर वैरागडे, घनश्याम ठलाल, महेंद्र मेश्राम, नरेंद्र पटणे, लीलाधर घोसेकर, महेश खोबरे गिरीधर मदनकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक