हमाली व कमिशनची रक्कम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:37+5:30

उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव, सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास दीड महिन्यापासून प्रत्येक केंद्रांवर १० हजार क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आहे.

Pay homage and commission | हमाली व कमिशनची रक्कम द्या

हमाली व कमिशनची रक्कम द्या

googlenewsNext
ठळक मुद्देउपव्यवस्थापकांना निवेदन : कुरखेडा तालुक्यातील १० संस्थांनी केली सामूहिकपणे खरेदी बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळाकडून आधारभूत धान खरेदी प्रक्रियेत आविका संस्थाना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत १० संस्थांनी सोमवारपासून सामूहिकपणे धान खरेदी बंद करण्यात आली. व याबाबत मागण्यांचे निवेदन उपप्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आले.
उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत वडेगाव, आंधळी, गेवर्धा, कुरखेडा, कढोली, देऊळगाव, सोनसरी, गोठणगाव व घाटी येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील जवळपास दीड महिन्यापासून प्रत्येक केंद्रांवर १० हजार क्विंटलपेक्षा अधिक धानाची खरेदी करण्यात आली आहे. मात्र आदिवासी महामंडळाचा असहकार्य व खरेदी प्रक्रीया संदर्भात उदासीन धोरणामुळे आविका खरेदी संस्था अडचणीत सापडलेल्या आहेत. अनेक संस्थाची खरेदी ही खुल्या ओट्यावर होते व त्यांची जवळपास पूर्ण झालेली आहे. मात्र महामंडळाकडून धानाची उचल करण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार हमाली व कमिशनची व्यवस्था करणे ही अभिकर्ता म्हणून महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र अद्याप हमाली व कमिशनची रक्कम संस्थाना प्राप्त झालेली नाही, असे संस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात धानाचे चुकारे थकले असल्याने शेतकऱ्यांचा रोष संस्थाना सोसावा लागत आहे. यावर्षी अवकाळी पावसाचा फटकासुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रांना बसत आहे. मात्र पुरेशा प्रमाणात ताळपत्र्यांचा पुरवठा संस्थाना करण्यात आलेला नाही. अशावेळी धान खराब झाल्यास दीडपट वसूलीचे पत्र संस्थाना महामंडळाकडून देण्यात येते. अशा धोरणाविरोधात संतप्त होत सोमवारपासून येथील सर्व आविका संस्थानी सामूहिक काटा बंद आंदोलन पुकारत खरेदी थांबविलेली आहे. त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान व अडचणीस आविका संस्था जबाबदार राहणार नाही, असे उपविभागिय अधिकारी व तहसीलदार कुरखेडा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आविका संस्थेच्या मागण्या निकाली काढाव्या, अशी मागणी आविका संस्था कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव तलमले, सचिव हेमंत शेंदरे, सुधाकर वैरागडे, घनश्याम ठलाल, महेंद्र मेश्राम, नरेंद्र पटणे, लीलाधर घोसेकर, महेश खोबरे गिरीधर मदनकर यांनी केली आहे.
 

Web Title: Pay homage and commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.