सातव्या वेतन आयाेगाची व महागाई भत्त्याची थकबाकी अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:24 IST2021-06-20T04:24:44+5:302021-06-20T04:24:44+5:30
गडचिराेली : कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेग थकबाकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम तसेच महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने अदा करण्यात ...

सातव्या वेतन आयाेगाची व महागाई भत्त्याची थकबाकी अदा करा
गडचिराेली : कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयाेग थकबाकीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम तसेच महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे राज्य सरचिटणीस अशाेक थूल, कार्याध्यक्ष दयाराम खाराेडे, राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या आग्रही मागणीनंतर १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयाेग, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१९ पासून प्रत्यक्षात देण्यात आला आहे. तीन वर्षांच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत पुढील पाच वर्षांमध्ये पाच समान हप्त्यांत जमा करण्यासाठी संघटनांनी संमती दिली हाेती. दरम्यान, १ जुलै २०२० राेजी देय असलेल्या सातव्या वेतन आयाेग थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे प्रदान पुढे ढकलण्याच्या राज्य शासनाच्या एकतर्फी निर्णयामुळे राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली हाेती. सातव्या वेतन आयाेग थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची व तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करावी, अशी मागणी महासंघाने केली आहे. प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याची थकीत रक्कम अदा करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.