खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

By Admin | Updated: September 6, 2014 01:52 IST2014-09-06T01:52:30+5:302014-09-06T01:52:30+5:30

गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरील चारही मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर खड्डे पडले होते.

Pavement work to start at the war level | खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

गडचिरोली : गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणावरील चारही मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर खड्डे पडले होते. खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होते. या संदर्भात ५ सप्टेंबर रोजी लोकमतने खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणारे वृत्त प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला व त्यांनी शहरातील प्रमुख चार मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी सकाळपासूनच चंद्रपूर मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले. स्थानिक खोब्रागडे महाविद्यालयासमोरील खड्ड्यांमध्ये गिट्टी टाकून ते खड्डे बुजविण्याचे काम मजूर करीत होते. गडचिरोली शहरातील खड्ड्याच्या समस्येबाबत लोकमतने केलेल्या जागरचेही अनेक नागरिकांनी कौतुक केले. अनेकांनी दूरध्वनी व भ्रमणध्वनीवरून लोकमतचे अभिनंदन केले. प्रसार माध्यमांनी जनतेचा प्रश्न मांडला, असेही मतही अनेकांनी व्यक्त केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Pavement work to start at the war level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.