१३० च्या वर रूग्ण आकडा पोहोचला

By Admin | Updated: November 18, 2015 01:27 IST2015-11-18T01:27:40+5:302015-11-18T01:27:40+5:30

संपूर्ण कोरची तालुक्यात हिवतापाचा प्रकोप सुरु असून, मंगळवारी आणखी ३५ रुग्णांची भर पडल्याने हिवताप पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा १३० च्या वर पोहचला आहे.

A patient's figure is more than 130 | १३० च्या वर रूग्ण आकडा पोहोचला

१३० च्या वर रूग्ण आकडा पोहोचला

मलेरियाचा प्रकोप कायम : एकाच डॉक्टरवर भार; रूग्णालयात रूग्णांची प्रचंड गर्दी
कोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात हिवतापाचा प्रकोप सुरु असून, मंगळवारी आणखी ३५ रुग्णांची भर पडल्याने हिवताप पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा १३० च्या वर पोहचला आहे. सर्वत्र भयावह परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन व हिवताप विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
कोरची तालुक्यातील दीडशेहून अधिक नागरिक हिवतापाने फणफणत असून, तब्बल १३५ रुग्णांना हिवतापाची लागण झाली आहे. मात्र जिल्हा स्थळावरुन डॉक्टरांची चमू पाठविण्यात न आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात एकतरी रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. या गावांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेणे गरजेचे असताना प्रशासनाने मात्र त्याकडे अक्षम्य कानाडोळा केला आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी न घेतल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
३० खाटांची व्यवस्था असलेल्या या रूग्णालयात अनेक रूग्ण खाली झोपून उपचार घेत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातून दररोज मलेरिया रूग्ण येथे येऊन दाखल होत आहेत. मात्र या रूग्णालयात डॉ. येळणे हे एकमेव वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवा देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: A patient's figure is more than 130

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.