औषधी निर्मात्यांकडून रुग्णांची तपासणी

By Admin | Updated: April 23, 2017 01:34 IST2017-04-23T01:34:06+5:302017-04-23T01:34:06+5:30

जिल्हा परिषद सदस्य संपत आळे व भाग्यवान टेकाम यांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला

Patient inspection by medicines | औषधी निर्मात्यांकडून रुग्णांची तपासणी

औषधी निर्मात्यांकडून रुग्णांची तपासणी

जि. प. सदस्यांच्या भेटीत पुढे आली माहिती : दोन्ही वैद्यकीय अधिकारी रजेवर
वैरागड : जिल्हा परिषद सदस्य संपत आळे व भाग्यवान टेकाम यांनी कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली असता, येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याचे आढळून आले. औषधी निर्माता कर्मचारी बाह्यरुग्णांची तपासणी करीत असल्याचे दिसून आले.
कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. डॉ. ए. ए. सोनवने हे २० व २१ एप्रिल रोजी वैद्यकीय प्रशिक्षणासाठी नागपूरला गेले होते आणि २२ एप्रिल रोजी वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम असल्याने ते किरकोळ रजेवर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया रामटेके मागील महिनाभरापासून वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती मिळाली. या रुग्णालयाबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून जिल्हा परिषद सदस्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार रुग्णालयाला जिल्हा परिषद सदस्य संपत आळे व भाग्यवान टेकाम यांनी भेट दिली. भेटीदरम्यान कढोली येथील नागरिकांनी आपल्या तक्रारी जिल्हा परिषद सदस्यांसमोर मांडल्या. आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून शस्त्रक्रिया कक्ष पावसाळ्यात गळतो. दवाखान्याच्या भिंती जीर्ण झाल्या असल्याने नवीन इमारतीचे बांधकाम होणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांनी केली.
नवीन इमारत बांधण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्यांनी दिले. रुग्णालयात असलेल्या रुग्णांची व गरोदर मातांची जिल्हा परिषद सदस्यांनी विचारपूस केली. (वार्ताहर)

Web Title: Patient inspection by medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.