प्रवासी जीप उलटून पाच गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:16 IST2017-09-10T01:16:46+5:302017-09-10T01:16:56+5:30

तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी जीप उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली...

 Passenger Jeep reversed five serious | प्रवासी जीप उलटून पाच गंभीर

प्रवासी जीप उलटून पाच गंभीर

ठळक मुद्देदुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न : चांदागड-मोहगाव मार्गावर कोसी फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : तालुक्यातील चांदागड-मोहगाव रस्त्यावरील कोसी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात खासगी प्रवासी जीप उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली
या अपघातात दुचाकीवरील तीन, तर चारचाकीतून प्रवास करणारे दोन, असे एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये कोसी येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक अक्षय बाळापुरे (३६), जीवन बोगा (५०) रा.कोसी, फुलचंद बोगा (३२) रा. पळसगाव, काशीराम वट्टी (५५) रा.मोहगाव व गुलाब भिवनकर (५७) रा. तळोधी-बाळापूर यांचा समावेश आहे.
या घटनेत तीन जण मोटारसायकलने सोनसरीवरून कोसीला जात होते. दरम्यान मोहगाववरून कुरखेड्याकडे प्रवासी घेऊन येणाºया खासगी चारचाकी वाहनाच्या चालकाचे दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात संतुलन बिघडल्याने चारचाकी वाहन उलटले. घटनेची माहिती मिळताच भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना उपचारासाठी सहकार्य केले.
गेल्या काही दिवसांपासून कुरखेडा तालुक्यासह जिल्हाभरात अपघात वाढले आहेत. ओव्हरलोड वाहतूक वाढल्याने अपघात होत आहेत. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. घटनास्थळावर पाहणाºयांची गर्दी झाली होती.

Web Title:  Passenger Jeep reversed five serious