शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांचे पालकमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: June 8, 2015 02:19 IST

अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या समस्या निकाली काढून अपंग कल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, ...

चुरमुरा : अपंग कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या समस्या निकाली काढून अपंग कल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/ अधिकारी संघटनेच्या वतीने राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे शुक्रवारी निवेदनातून करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ तीन टक्के आरक्षणाप्रमाणे देण्यात यावा, पावसाळी अधिवेशनात १९९५ च्या अधिनियमातील धोरण निश्चित करून अंमलबजावणी करावी, अपंग बेरोजगारासाठी तीन टक्के आरक्षणाप्रमाणे सर्व आस्थापनेतील पदभरती करावी, अपंग कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे उपकरणे व साधने उपलब्ध करावित, जिल्हा परिषदेच्या आर्थिक अंदाजपत्रकात अपंगांसाठीचा एकूण तीन टक्के निधी राखीव ठेवण्यात यावा, अपंगांना दिल्या जाणाऱ्या अमानवी वागणुकीला प्रतिबंध घालण्यासाठी अपंग अ‍ॅट्रॉसीटी कायदा अंमलात आणावा, आॅनलाईन प्रमाणपत्र योजना सुलभ सोयीची होण्याकरिता शासन स्तरावर योग्य ती उपाययोजना करावी, नोव्हेंबर २००५ पासून बंद झालेली पेंशन योजना पूर्ववत करावी, कंत्राटी अपंग कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, अपंग व्यक्तीला विनाअट घरकूल द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता.
पालकमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष बंडू कुमरे, सरचिटणीस अतुल मेश्राम, आनंद गुरनुले, लक्ष्मण वाढई, सुनील झाडे, रंजन बल्लमवार, राजश्री मेश्राम, शालू कांबळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)