धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:37 IST2017-10-05T23:37:47+5:302017-10-05T23:37:57+5:30

अन्न व औषध विभागाने आष्टी परिसरातील खर्रा विक्री करणाºया पानठेल्यांवर बुधवारी धाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते.

Panthele off Ashti before the departure | धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद

धाडीपूर्वीच आष्टीतील पानठेले बंद

ठळक मुद्देधाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद



लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : अन्न व औषध विभागाने आष्टी परिसरातील खर्रा विक्री करणाºया पानठेल्यांवर बुधवारी धाड टाकणार असल्याची माहिती प्राप्त होताच दुपारनंतर आष्टीसह परिसरातील पानठेले बंद ठेवण्यात आले होते. यामुळे खर्रा शौकिनांचे फार मोठे हाल झाले.
आष्टी येथे ६ सुगंधित तंबाखू विक्रेते आहेत. या तंबाखूवर बंदी असतानाही चंद्रपूर येथून मुख्य डिलरकडून सुगंधित तंबाखूचा पुरवठा केला जातो. आष्टी येथील डिलर पानठेलाधारकांना सुगंधित तंबाखू उपलब्ध करून देतात. ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाला माहित झाल्यानंतर या विभागाने आष्टीत धाड टाकण्याचे नियोजन केले होते. मात्र ही बाब पानठेलाधारकांपर्यंत पोहोचल्यानंतर बुधवारी पानठेले बंद ठेवले होते. त्यामुळे ते कारवाईपासून वाचले.

Web Title: Panthele off Ashti before the departure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.