पांढरीगोटा येथे १० व्यसनी रुग्णांनी घेतला औषधाेपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:41 IST2021-09-23T04:41:30+5:302021-09-23T04:41:30+5:30
क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून एकूण १० रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा संकल्प केला. जिल्ह्यातील ...

पांढरीगोटा येथे १० व्यसनी रुग्णांनी घेतला औषधाेपचार
क्लिनिकचे आयोजन करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून एकूण १०
रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा संकल्प केला.
जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम व अतिदुर्गम
भागातील दारू सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध
व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिक घेण्यात
येते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. पांढरीगोटा
येथेही गाव संघटनेच्या मागणीनुसार क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी १० रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. क्लिनिकला
भेट दिलेल्या रुग्णांना प्राजू गायकवाड यांनी समुपदेशन केले. संयोजक
प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची माहिती घेत दारूचे दुष्परिणाम
सांगितले. क्लिनिकचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक निळा किन्नाके यांनी
केले. यावेळी सरपंच बुधराम फुलकवर, संघटना अध्यक्ष दलसाय मडावी,
उर्मिला मडावी, मुख्याध्यापक चंद्रशेखर अंबादे, सहाय्यक शिक्षक बखर यांच्यासह
गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.