पंचायत समितीत नागामुळे पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:36 AM2021-05-14T04:36:42+5:302021-05-14T04:36:42+5:30

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास लेखा विभागात कर्तव्यावर असलेले लेखापाल चिकराम हे खुर्चीवरून उठून कुलरजवळून ...

In the Panchayat Samiti, he ran away due to a snake | पंचायत समितीत नागामुळे पळापळ

पंचायत समितीत नागामुळे पळापळ

Next

प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना दुपारी चारच्या सुमारास लेखा विभागात कर्तव्यावर असलेले लेखापाल चिकराम हे खुर्चीवरून उठून कुलरजवळून बाहेर येत असताना त्यांना सापाचा फुत्कार ऐकायला आला. येथे कुठून साप येणार? असा प्रश्न त्यांना पडला. परंतु बघूनच घेऊ म्हणून त्यांनी दुरूनच डोकावून पाहिले, तर काय तिथे फणा काढलेला साप नजरेस पडला. लागलीच ही बातमी पं. स. कार्यालयाच्या सर्व विभागांमध्ये पसरली आणि एकच पळापळ सुरू झाली. यांत्रिकी अधिकारी बंडू बगमारे यांनी समयसुचकता दाखवत साहिल मेश्राम व रोहित पाटील या सर्पमित्रांना बोलवले. त्यांनी मोठ्या प्रयासाने सापाला पकडले. कोंढाळाजवळील जंगलात सापाला सोडून दिले. मात्र, या प्रकारामुळे पंचायत समितीसह बाजूच्या कोविड सेंटरमध्येही दहशत पसरली.

Web Title: In the Panchayat Samiti, he ran away due to a snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.