अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 11:58 PM2019-10-31T23:58:04+5:302019-10-31T23:58:48+5:30

निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता.

Panchanama orders were finally obtained | अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

Next
ठळक मुद्देअवकाळी पावसाचे तांडव : पीकांच्या नुकसानीची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच सत्ता स्थापनेत सर्वजण व्यस्त असताना मंगळवार दि.२९ रोजी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.३१) हे आदेश जारी केले. त्यामुळे येत्या आठवड्यात पंचनाम्यांना वेग येणार आहे. मात्र पंचनाम्यांना उशिर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार का? याबद्दल शंकाही व्यक्त होत आहे.
निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही.
एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कापूस, सोयाबीन, धान, तीळ आदी खरिपाची पिके निघण्याच्या मार्गावर असताना अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी कालावधीच्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात भिजत आहेत.
सतत आठ दिवस बांधीत पाणी साचून असल्याने सदर धान पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले आहे. पावसामुळे या धानाची कापणी लांबली आहे. तर जास्त कालावधीचे धान आता निसवले आहे. जोराच्या वादळ वाºयामुळे हे धान जमिनीवर कोसळले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. कापसाचे बोंड फुटले आहेत. पावसात भिजून त्यांचेही नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक नष्ट होताना बघून शेतकºयाची चिंता वाढली आहे. मात्र निसर्गासमोर हतबल होण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसल्याने तो केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे.
शेतकरी अडचणीत आला असताना मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचीत आमदार सत्ता स्थापनेच्या कामात व्यस्त आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या लागल्या. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयांमध्ये रूजू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होऊ शकले नाही.
आपल्या कार्यक्षेत्रात नुकसान झाल्याचे माहित असतानाही अनेक कर्मचारी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे अनेकांनी अजूनही पंचनामे केले नाही. पंचनाम्यांना उशीर झाल्यास मदत मिळण्यास विलंब होणार हे सत्य आहे. निवडणुकीत मते मागण्यासाठी शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणारे सरकार निवडणुकीनंतर मात्र आपले कर्तव्य विसरते हेच यावरून दिसून येते.

-तर शेतकरी राहतील मदतीपासून वंचित
मागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळवाºयासह पाऊस होत आहे. तसेच खरीप पिके निघण्याच्या मार्गावर असताना पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कुठेही ‘अतिवृष्टी’ झालेली नाही. मात्र राज्याच्या महसूल व वनविभागाने २९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात ऑक्टोबरमध्ये ‘अतिवृष्टी’मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या संभ्रमाचे वातावरण आहे. या पत्राचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, त्या ठिकाणी काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

Web Title: Panchanama orders were finally obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.