पळसगाव नाल्यावरील पूल धोकादायक
By Admin | Updated: August 7, 2016 01:50 IST2016-08-07T01:50:03+5:302016-08-07T01:50:03+5:30
जोगीसाखरा ते पळसगाव दरम्यानच्या नाल्यावर ठेंगणा पूल आहे. सदर पूल अत्यंत जुना आहे.

पळसगाव नाल्यावरील पूल धोकादायक
जुना व ठेंगणा : जड वाहनांमुळे कोसळण्याची शक्यता
जोगीसाखरा : जोगीसाखरा ते पळसगाव दरम्यानच्या नाल्यावर ठेंगणा पूल आहे. सदर पूल अत्यंत जुना आहे. त्यामुळे या पुलाने धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या नाल्यावर नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कुरखेडा, गोंदिया, देसाईगंजकडे जाण्यासाठी जोगीसाखरा-पळसगाव या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ राहते. मात्र या मार्गावर असलेल्या नाल्यावरील ठेंगणे व जुने पूल रहदारीस मारक ठरत आहे. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यादरम्यान किमान आठ ते दहा वेळा या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक प्रभावीत होते. विशेषकरून जोगीसाखरा व पळसगाव परिसरातील नागरिकांची फार मोठी अडचण निर्माण होते. त्याचबरोबर सदर पूल अत्यंत जुने आहे. जड वाहतुकीमुळे हे पूल कधीही कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. मागील अनेक वर्षांपासून पुलाची डागडुजी करण्यात आली नसल्याने ते मोडकळीस आलेले आहे. त्यामुळे सदर पूल निर्लेखित करून नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.