पालखीत विराजले मार्कंडेश्वर!
By Admin | Updated: February 21, 2015 01:18 IST2015-02-21T01:18:38+5:302015-02-21T01:18:38+5:30
चामोर्शी : बिजच्या दिवशी शुक्रवारला मार्कंडा येथे श्री मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली.

पालखीत विराजले मार्कंडेश्वर!
चामोर्शी : बिजच्या दिवशी शुक्रवारला मार्कंडा येथे श्री मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. चंद्र दर्शनानंतर निघालेल्या या पालखीचे हजारों भाविकांनी दर्शन घेतले.
शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मार्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरातून पालखी काढण्यात आली. सदर पालखी यात्रा भरलेल्या रस्त्यावरून ते बस आगारापर्यंत फिरविण्यात आली. गर्दीमुळे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ज्या भाविकांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले नाही, त्या भाविकांनी आज पालखीत विराजमान झालेल्या मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. ढोल, ताशे व सनईच्या गजरात पालखी काढण्यात आली. दरम्यान हर हर महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण मार्कंडानगरी दुमदुमून गेली. तसेच मार्कंडेश्वराच्या पालखीच्या सभोवताल मोठ्या संख्येने भाविक जमले होते. पालखीच्या सुरूवातीला श्री मार्कंडेश्वराच्या मुख्य मंदिरात माजी खासदार तथा ट्रस्टचे विश्वस्त मारोतराव कोवासे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती अतुल गण्यारपवार, अशोक तिवारी यांच्या हस्ते शिवलिंगाची पूजा करण्यात आली. त्यानंतर दुपारी ३ वाजता नगरीतून पालखी काढण्यात आली.
यावेळी मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, उपाध्यक्ष किसन गिरडकर, सचिव केशव आंबटवार, बालस्वामी पिपरे महाराज, जयराम चलाख, बंडू चलाख, मच्छिंद्र चलाख, आबाजी धोडरे, भैय्याजी चलाख, रामचंद्र मुनरर्तीवार, गंगाधर दाडमवार, रामेश्वर काबरा, सुखदेव नैताम, चामोर्शीच्या पं.स. सभापती शशीबाई चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, तहसीलदार अशोक कुंभरे, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, चडगुलवार, राजेश ठाकूर, नशाबंदी जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, दिवाकर नैताम, विस्तार अधिकारी मुद्देमवार, डी. बी. भोगे आदी उपस्थित होते.
भजन मंडळीची गर्दी
४पालखीत मार्कंडादेव, चामोर्शीलगतचे हरे राम, हरे कृष्ण मंदिरातील भजन मंडळ सहभागी झाले होते. याशिवाय गडचिरोली येथील बँड पथकही होते.