महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासीबहुल, अतिदुर्गम भामरागड तालुक्याच्या अनेक गावांमध्ये आजही रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आदीसह इतर मूलभूत सुविधा पोहोचल्याच नाही. ...
रेल्वे मार्गामुळे देसाईगंज शहराची दोन भागात विभागणी झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुस्थितीत चालण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने भूमिगत पुलाचे बांधकाम केले. ...
जि. प. सिंचाई उपविभागांतर्गत कुरखेडा व कोरची तालुक्यात माजी मालगुजारी तलावातील गाळाचा उपसा उन्हाळ्यात करण्यात आला. यामुळे मामा तलावातील जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ झाली आहे. ...
आदिवासी विकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर विभागीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये भामरागड प्रकल्पाने सलग ११ व्यांदा चॅम्पियनशिप पटकाविली. ...
तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या दामरंचा व परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक प्रशासनाच्या वतीने अद्यापही झाली नाही. परिसरातील पूल, रस्ते व अन्य सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील लोकांना मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची प्रतीक्षा आहे. ...
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांना जाहीर करण्यात आला असून विशेष पुरस्कारासाठी एंजल देवकुले हिची निवड करण्यात आली आहे. ...
गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव-सावरगाव या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे. विशेष म्हणजे, जपतलाई गावाजवळ जीवघेणे खड्डे निर्माण झाले असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. ...
ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले. ...
१ एप्रिल २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या दहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर सुमारे ८२ कोटी ७५ लाख ८४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यापैकी ४७ कोटी ६१ लाख रूपये रोहयो मजुरांच्या मजुरीवर खर्च करण्यात आले आह ...
नक्षल्यांमुळेच गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात फार मोठी बाधा निर्माण झाली आहे. त्यांचे बंधन झुगारण्यासाठी त्यांना गावात बंदी घाला, असे आवाहन भामरागडच्या प्रभारी पोलीस अधिकारी अंजली राजपूत यांनी केले. ...