उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत २०१७-१८ वर्षात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून तालुक्यातील वडधा येथील शेतकरी आसाराम लक्ष्मण बाळबुद्धे, अरूण मोहन गायकवाड, काशिनाथ दिनू गायकवाड व इतर शेतकऱ्यांना अनुदानावर आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे व ...
भारतीय संविधानाच्या अनुसूची ५ व ६ तसेच २४४ नुसार ग्रामसभांना विशेष अधिकार मिळाले आहे. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आदिवासींवर आपल्या अधिकार व हक्कापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. ...
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत चामोर्शीचे तहसीलदार ए.डी. येरचे व नायब तहसीलदार (संगायो) एस.के. बावणे यांच्या हस्ते सोमवारी १६ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार प्रमाणे ३ लाख २० हजार रूपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. ...
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे सुरू आहे. येथील अनेक रुग्णालयांमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने रुग्ण त्रस्त आहेत. पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिकाही उपलब्ध नाहीत. ...
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी एनडीए सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प गुरूवारी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचे सत्ताधाऱ्यांनी स्वागत केले. मात्र विरोधकांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नाही, केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांच ...
पोलीस विभाग, आदर्श मित्र मंडळ धनकवडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये गुरूवारी सद्भावना परीक्षा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातील सुमारे १०७ शाळांमधील १३ हजार २२१ विद्यार्थ्यांनी सदर परीक्षा दिली. ...
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी प्रवासाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागातर्फे बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील खरपुंडी येथील जि.प. प्राथमिक शाळेतील ३६ मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. ...
ग्रामसभेला वनहक्क मिळवून देण्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आणि आपल्या आगळ्या कार्यशैलीने दिल्लीपर्यंत ओळख निर्माण करणाऱ्या मेंढा-लेखा या गावात रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा जागर झाला. ...
विद्यमान सरकारच्या एक वर्षाच्या काळात गॅसच्या किमतीत तब्बल १९ वेळा वाढ झाली. याशिवाय पेट्रोल व डिझेलचेही दर प्रचंड वाढले. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला. ...