राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदूळ मांडून त्याची विक्री करण्याची संधी मिळणार आहे. ...
तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. ...
स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष करण्याची मानसिकता व ताकद महिलांनी निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी केले. ...
बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायात उतरलेल्या महिलांनी आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातही रस घ्यावा. राजकारणात महिलांचा सहभाग वाढल्यास कारभार आणखी चांगला होईल. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून विविध प्रकारचे आंदोलने करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य देता आले नाही. ...
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील जवळपास ३५० शिक्षक उपस्थित होते. ...
तब्बल २० वर्षाच्या कालावधीनंतर नगर परिषदेने कर वसुलीची धडक मोहीम सुरू करून थकीत करधारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. तरीही १४ मार्चपर्यंत मालमत्ता कराची केवळ १ कोटी ५० लाख ४३ हजार रूपये एवढी वसुली झाली आहे. ...
मुलगा व सून यांच्यांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या बापाला मुलाने जबर मारहाण केल्याने या मारहानीत बापाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मरेगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली. ...
सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा कार्यालयाच्या अखत्यारीत अंगारा गाव येते. तर कुलकुली हे गाव सार्वजनिक बांधकाम विभाग आरमोरी कार्यालयाच्या हद्दीत समाविष्ठ आहे. ...