गडचिरोली येथील बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठी १५ दिवसांपूर्वीच कंत्राटदाराने टीन लावून अर्ध्यापेक्षा अधिक जागा अडविली. त्यामुळे बस थांबण्यासाठी तसेच प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. ...
येथील कोत्तुर रोड, वॉर्ड नं.२ मधील रहिवासी सूरज मुतय्या भोगावार (२३) या युवकाचा मृतदेह सोमवारी प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर आढळला. तो गेल्या गुरूवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. ...
कुष्ठरोगावर प्रभावी औषध असले तरी ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याबाबत माहिती नाही. परिणामी कुष्ठरोगाचे अनिष्ट परिणाम कुष्ठरोग्याला भोगावे लागतात. ...
जि.प. अभियंता संवर्गाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावाव्या, या मागणीसाठी जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने दोन दिवशीय सामूहिक रजा आंदोलन सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरू करण्यात आले. ...
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी १५ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. ...
तालुक्यातील सायगाव येथे अर्धवट तुटलेल्या स्थितीत वीज खांब उभा आहे. या ठिकाणचा वीज खांब बदलवून नवीन वीज खांब लावण्यात यावा, अशी मागणी सायगाव येथील अनिल प्रधान व इतर नागरिकांनी महावितरणकडे केली होती. ...
अहेरी उपविभागाच्या एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गावरील पूलही क्षतिग्रस्त झाल्याने राज्य परिवहन महामंडळाने एटापल्ली-जारावंडी मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. ...
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करून आपल्याला शांती व विकास आवश्यक असल्याचे आवाहन नक्षल्यांना केले. ...
भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गतच्या नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षलींची चार स्मारके उद्ध्वस्त केली. ...