तेंदुपत्त्याची कामे करण्यासाठी गावक-यांसोबत जंगलाकडे जात असलेल्या कटेझरीच्या दुर्गुराम सानुराम कोल्हे यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण करून खून केला होता. त्यांच्या स्मृति जपत गावक-यांनी त्यांचे गावात स्मारक उभारून नक्षल्यांचा निषेध नोंदविला. ...
तेलंगणात कार्यरत असलेल्या मंगी दलमची उपकमांडर ज्योती उर्फ रविना जोगा पुडयामी (२६ वर्ष) या जहाल महिला नक्षलीने बुधवारी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर चार लाख रुपयांचे बक्षीस राज्य शासनाने ठेवले होते. ...
२०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बँका, सहकारी बँका व ग्रामीण बँकांना खरीप व रबी या हंगामामध्ये शेतकऱ्यांना २३७ कोटी ४ लाख ८५ हजार रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षी २२० कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ...
गिट्टी खाली करून परत येणाऱ्या टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होवून टिप्पर उलटला. या अपघातात चालकासह एक मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी कोरची-पुराडा मार्गावर घडली. अमोल सहारे (२७) रा. सावंगी असे जखमी टिप्पर चालकाचे नाव आहे. ...
नगर पंचायत क्षेत्रातील गडअहेरी, गडबामणी, चेरपल्ली आदी गावांकरिता वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावरील जाफ्राबाद (टेकडाताला) येथील गूळ साठवलेल्या घराला पोलिसांनी सील ठोकली. मात्र या घरातील गूळ अचानक गायब झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ...
वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे. ...
पोलिसांच्या सातत्त्यपूर्ण कामगिरीमुळे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा समूळ नायनाट होण्यास मदत होईल. त्यामुळे नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात यावे व लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ...
अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. ...