जिल्ह्यात मुख्य दहा नद्या वाहत असून जिल्हा भौगोलिकदृष्टया ४२० किलोमिटर लांबीत विस्तारलेला आहे. पावसाचे सरासरी पर्जन्यमान १ हजार ४०० मिमी असल्यामुळे आणि सर्व उपनद्या मुख्य नद्यांशी जोडत असल्यामुळे पावसाळयात बऱ्याचदा दळणवळण बंद होते. ...
लग्न समारंभात शिल्लक राहिलेले अन्न जनावरांना खाऊ घातले जाते. मात्र सदर अन्न जनावरांसाठी अतिशय धोकादायक असून शिळे अन्न खाल्ल्यामुळे शिवणी खुर्द येथील तीन जनावरे नुकतीच दगावली आहेत. ...
गेल्या २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्यातील कसनासूर जंगलात तसेच २३ एप्रिल रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम परिसरात झालेल्या चकमकी बनावट असल्याचा आरोप करीत पोलिसांनी मृतकांची सामूहिक हत्या केली. ...
जिल्ह्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या आरमोरी तालुक्यातील वघाळा (जुना) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पाहुण्या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाहुण्या पक्ष्यांचे स्वागत, संवर्धन व संरक्षणासाठी वघाळावासीय सज्ज झाले आहेत. तसेच वन्यजीव ...
तालुक्यातील पेंढरी ग्रामसभेने तिसऱ्यांदा तेंदूपत्ता लिलाव आयोजित केला होता. मात्र एकही कंत्राटदार तेंदूपत्ता लिलावाला हजर झाला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याचे संकलन अडचणीत आले आहे. ...
तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
रानडुकरांच्या कळपाला वाचविताना वऱ्हाडी वाहन रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडाला धडकले. यामध्ये पाच वऱ्हाडी जखमी झाले. तर एक रानडुकर वाहनात सापडून ठार झाला. सदर घटना देसाईगंज-कुरखेडा मार्गावर कसारी फाट्याजवळ रविवारी सकाळी घडली. ...
यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. ...
धानोरा तालुक्यातील चातगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या होरेकसा येथील एका ग्रामस्थाची नक्षलवाद्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून हत्या केली. पांडुरंग गांडोजी पदा (४६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. ...
दारुसाठी पैसे न दिल्याने पत्नीच्या अंगावर केरोसीन ओतून तिला जाळून ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया पतीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...