वारंवार दारू विक्रेते व तंबाखू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होतात. परंतु अनेकवेळा हे विक्रेते सुटून येतात, अशा विक्रेत्यांवर यापुढे एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, तडीपारीचा गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. ...
वीज वाहिण्या, वितरण रोहित्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ...
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खांदला ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४०० रूपये व राजाराम ग्रामपंचायतीला प्रती शेकडा ४५० रूपये तेंदूपत्त्याचा भाव मिळाला आहे. ...
पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षली ठार होण्याच्या घटनेचा निषेध म्हणून गुरूवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदला काही ठिकाणी गावकऱ्यांनी उघड विरोध केला. यावेळी त्यांनी लावलेले बॅनरही जाळले. ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शिलाई मशिन, विद्यार्थिनींना सायकली आणि सौरकंदीलांचे वाटप करण्यासाठी असलेल्या योजना बिनकामाच्या ठरल्या आहेत. लाभार्थींची निवड केल्यानंतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी तयारच होत नसल्याचे अजब चित् ...
यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. ...
तालुक्यातील चिचोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वाघभूमी येथील नागरिकांना जीवघेण्या विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. परंतु या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत रोष व्यक्त होत आहे. ...
तंबाखू व दारूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सहभागी व अंमलबजावणी करणाऱ्या कार्यालयांनी प्रथम व्यसनमुक्त कार्यालय झाल्याचे जाहीर करुन तसा फलक दर्शनी भागावर लावावा. ...
स्थानिक पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नेहमी दांडी मारत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी पशुसवंर्धन विभाग ओस पडला आहे. परिणामी ग्रामीण भागातून दूरवरून येणाऱ्या पशुपालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
तालुक्यातील येंगलखेडा येथे दोन दिवासांपूर्वी जनावरे सायंकाळी चारा खाऊन घरी पतल्यानंतर अज्ञात आजाराची लागण झाल्याने दोन शेळ्या व एका बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर बुधवारी सहा जनावरांचा पशुपालकांच्या गोठ्यात मृत्यू झाला. ...