मद्यधूंद अवस्थेत कार चालवून चार नागरिकांना जखमी करणाऱ्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाश प्रल्हादनाथ गोजारा (२६) रा. कन्नमवार वार्ड देसाईगंज असे मद्यधूंद चालकाचे नाव आहे. ओमप्रकाश हा धानोरावरून गडचिरोली मार्गे देसाईगंजकडे जात होता. ...
महत्त्वाच्या लसीकरणापासून जिल्ह्यातील एकही गरोदर माता व बालक वंचित राहू नये, यासाठी १४ जून ते ३ जुलैपर्यंत शोधमोहीम राबविली जाणार आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या बालक व गरोदर मातांना लसीकरण केले जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहेत. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारतात. पावसा ...
स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सोनापूर कॉम्प्लेक्स परिसरातील बसेरा कॉलनीत दोन्ही बाजूच्या नालीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र संबंधित कंत्राटदाराने केवळ खोदकाम करून काम अर्धवट ठेवले आहे. ...
जिल्ह्यातील विविध २९ महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने खासदार, आमदारांच्या पुढाकाराने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी मुंबईच्या मंत्रालयात प्रमुख अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. ...
७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात विविध प्रकारचे वनोपज उपलब्ध आहे. या जिल्ह्यातील जांभूळ, रानमेवा व रानभाजी राज्यभरात पोहोचले आहे. रानमेवा व जांभूळाची स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे. ...
मद्यधुंद कारचालकाने चुकीच्या बाजूने कार चालवून पाच ते सहा जणांना उडविल्याची घटना बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील धानोरा मार्गावरील गुरूदेव हॉटेलजवळ घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत खरीप हंगामात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानही सोसावे लागले होते. सदर नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांना सरकारच्यावतीने शासकीय मदतही जाहीर करण्यात आली. ...