सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारात भाजीपाला कडाडल्याने ग्राहकांना प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला. ...
आलापल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफूूल गुळसडवा जप्त करण्याची कारवाई सुरू असताना २० एप्रिल रोजी आलापल्ली येथून ट्रकभर पांढरा गूळ जप्त करण्यात आला. यामुळे गूळ विक्रेत्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. ...
तापमान वाढल्यामुळे धानोरा शहरातील व परिसरातील पाणीस्त्रोताची पाणीपातळी खालावली आहे. त्यामुळे शहराच्या अर्ध्या भागात नगर पंचायत प्रशासन तसेच पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ललीत बरच्छा यांच्या पुढाकाराने नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा क ...
तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र क ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून अहेरी उपविभागात अवकाळी वादळाने थैैमान घातले आहे. शिवाय मेघगर्जनेसह पाऊस होत असल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून नुकसान झाले आहे. आता वादळाने उत्तरभाग आपल्या ताब्यात घेणे सुरू केले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजासाठी जे काम केले, त्याची परतफेड, उपकार आदिवासी समाज फेडू शकत नाही. आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी घटनेत तशी तरतूद करून ठेवली. ...
चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. ...
चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात नदी, नाले, तलाव, बोड्यांची संख्या मोठी आहे. तसेच मासेमारी व्यवसाय करणाऱ्या केवट-भोई-ढिवर समाज बांधवांची संख्या बºयापैकी आहे. या समाजबांधवांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन मासेमारी व्यवसाय आहे. ...
जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस ...
जमिनीवर पडलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलांचा स्पर्श होऊन बंडीला जुंपलेली बैलजोडी जागेवरच ठार झाली. प्रसंगावधान राखत शेतकरी व त्याची आई बैलबंडीवरून उतरल्याने ते सुखरूप आहेत. ...