आलापल्लीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या रामय्यापेठा येथील रेणुका राजाराम निकुरे या विद्यार्थिनीने गरीब परिस्थितीवर मात करीत कर सहायक वर्ग-३ पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती महाराष्ट्रातून ओबीसी प्रवर्गातून १७ वी आली आहे. तिचे हे यश जिल्ह्यातील इतर ...
पोलीस प्रशासन व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बटालियन क्रमांक ९ च्या वतीने अहेरी तालुक्याच्या रेपनपल्ली उपपोलीस ठाण्यात दुर्गम भागात असलेल्या तीन गावातील १०० वर नागरिकांना मच्छरदाणीचे वाटप करण्यात आले. ...
चामोर्शी येथे क्रीडा संकूल, बसस्थानक, बसडेपो आदी मंजूर विकासकामे कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या जमिनीची अधिग्रहण कार्यवाही होत नसल्याने चामोर्शी शहरातील कोट्यवधीची विकासकामे थंडबस्त्यात आहेत. ...
कुरखेडा-कोरची मार्गावरील जांभुळखेडा गावाजवळील नाल्यावर नक्षलवाद्यांनी १ मे रोजी भूसुरूंग स्फोट घडवून आणला. घटनेनंतर तिसऱ्या दिवशीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची डागडुजी केली नव्हती. त्यामुळे वाहतूक ठप्प पडली होती. ...
आरमोरी-ब्रह्मपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरच्या पुलाचे बेअरींगची दुरूस्ती रविवारी सकाळपासून करण्यात आली. दुरूस्तीसाठी पुलावरून वाहतूक बंद ठेवल्याने नागपूर, ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या व्यक्तींना देसाईगंज मार्गाने जावे लागले. ...
धानाच्या पिकाला बोडीच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध होते. कमी जागेत बोडी तयार करता येणे शक्य असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांकडून बोडी तयार करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी केली जात होती. ...
गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते. ...
आपल्याला निसर्गाचे चमत्कार अनेक ठिकाणी दिसतात़ असाच एक निसर्गाचा अनोखा चमत्कार अहेरी तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) येथे बघायला मिळतो़ अहेरी तालुका राजनगरी म्हणून सर्वदूर परिचयाचा असला तरी या तालुक्यातील आवलमरी (व्यंकटापूर) गावातील उकळत्या पाण्याचे ...