शेततळे, सिंचन विहीर व इतर स्वरूपातून गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या. या सिंचन सुविधेच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता दुबार पिकांकडे आपला कल वाढविला आहे. ...
सन २०१८-१९ या वर्षात कृषी विभागाच्या पथकांमार्फत बियाण्यांचे एकूण ५११ नमुने तपासण्यात आले. यापैकी १३ नमूने अप्रमाणित आढळून आले. यातील ५ नमुने न्यायप्रविष्ट प्रकरणात पात्र असून ८ प्रकरणे ताकीदपात्र आहे. ...
गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे ...
आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडू ...
कृषी विभागामार्फत उन्नत शेती समृद्धी शेतकरी मोहिमेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्हाभरातील एकूण ५६५ शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी यंत्राचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर लाभार्थ्यांचा सम ...
येथून जवळच असलेल्या सिमलतला गावालगत ठेवलेल्या तणसाच्या पाच ढिगांना शॉर्टसर्किटमुळे आग लागून ३२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. वादळामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किटमुळे ठिणगी खाली पडून तणसाच् ...
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी सुरू असलेल्या मानव विकास कार्यक्रमांतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात २०१८-१९ या वर्षात खर्च केलेल्या १५ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीपैकी सर्वाधिक निधी (५ कोटी ३५ लाख रुपये) विद्यार्थिनींना शाळे ...