मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त ...
राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. ...
चामोर्शी येथील केवळराम हरडे कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत भेंडाळा येथील शेतकऱ्यांना सगुणा पद्धीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ...
दुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यात एकूण २४९ शाळा आहेत. त्यापैकी १४७ शाळांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तर १०२ शाळांचे विद्युतीकरण झालेच नाही. ज्या शाळांचे विद्युतीकरण झाले आहे, त्या शाळांनी वीज बिल भरला नसल्याने संबंधित शाळ ...
धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीअंतर्गत येणाऱ्या खमनचेरू येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेच्या ५७ विद्यार्थिनींना गुरूवारी (दि.११) सकाळी देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाली. हा प्रकार लवकर लक्षात आल्याने आणि वेळीच उपचार मिळा ...
मागील सात-आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने त्रस्त झालेल्या अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन केले. नगर परिषदेला सर्व प्रकरण माहिती असतानाही कंत्राटदारावर काहीच कारवाई होत नसल्याने येथे सर् ...
विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी आरमोरी येथील महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनासमोर बुधवारी शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केली. अशा प्रकारचे हे आंदोलन जिल्ह्याच्या इतर तालुकास्तरावर झाले. ...
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली व नान्ही येथील कौलारू इमारती जीर्ण झाल्या आहेत. या दोन्ही इमारतींच्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नवीन इमारत बांधेपर्यंत नान्ही येथील कौलारू इमारतीची डागडुजी केली जात आहे. ...