सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कोत्तागुडम येथील परिवर्तन भवन या न.प.च्या ताब्यातील शासकीय इमारतीत खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा अवैधपणे भरविली जात आहे. मंगळवारी शाळेच्या छताचे स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाला आहे. ...
शासन निर्णयानुसार सफाई कामगारांना नवीन कंत्राट ३१ जुलैपर्यंत न दिल्यास १ आॅगस्टपासून जिल्ह्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला. ...
तालुक्यातील परसवाडी येथे महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावातील महिला यात सहभागी झाल्या होत्या. ...
कुपोषण निर्मूलनाच्या विविध प्रयोगानंतर आता केंद्र सरकारने संपूर्ण कुपोषणग्रस्त भागात पोषक घटक असणारा ‘फोर्टीफाईड तांदूळ’ पुरविण्याची योजना आखली आहे. ...
गडचिरोली शहरातील बहुप्रतीक्षित विकास कामांचे प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे शहरातील विकास कामे मार्गी लागण्याची आशा बळावली आहे. ...
तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
धानोरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पवनी येथील गरोदर मातेने गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतली होती. सदर महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. ...
स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते. ...