तालुक्यातील चुडीयाल ग्रामपंचायतीच्या इमारतीला बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. या आगीत ग्रामपंचायतीमधील साहित्य व महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाले. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
धानोरापासून चार किमी अंतरावर असलेल्या पवनी येथील गरोदर मातेने गर्भपात करण्यासाठी गावठी औषधी घेतली होती. सदर महिलेचा अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
आदिवासी भागातील धान खरेदीला प्राधान्य देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील गोदामांची कामे तत्काळ मार्गी लावावी, असे निर्देश आदिवासी व वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिले. ...
स्थानिक वार्ड क्रमांक ३ मधील लक्ष्मीपूर वार्डातील अंगणवाडी केंद्रावर छत टाकण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना १० बाय १० च्या किचन शेडमध्ये बसावे लागत आहे. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनविणे व शिक्षणही दिले जाते. ...
गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांच्या समस्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळ्या आहेत. या समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावा, अशी मागणी पालकमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आल ...
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलत कमी दर्जाच्या खताची विक्री करणाºया पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक खतसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई सोमवारी सायंकाळी चिचोली गावात करण्यात आली. ...
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या आठ किमी अंतरावर असलेल्या बोदली रेतीघाटातून रेती तस्करांनी हजारो ब्रास रेतीची चोरी केली. याबाबतचे वृत्त लोकमतने ९ जुलै रोजी छायाचित्रासह प्रकाशित केले होते. याची दखल घेत गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी रेत ...
गॅस व शिधापत्रिकेसाठी (कार्ड) जे लाभार्थी पात्र आहेत, या सर्व लाभार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत १५ आॅगस्टपर्यंत शिधापत्रिका व एजपीजी गॅसचे वाटप करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. ...
वैरागड-कढोली मार्गाच्या बाजूला सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदले. रोपटेही आणले. मात्र या रोपट्यांची लागवड न करताच सदर रोपटे रस्त्याच्या बाजूला फेकून देण्यात आले आहेत. यामुळे रोपटे व खड्डे खोदण्याचा खर्च वाया गेला आहे. ...
तीव्र उन्हामुळे जमिनीतील बिळात घर करून असलेले सरपटणारे प्राणी पाऊस पडताच बाहेर येतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये म ...