येथील विदर्भ कोकण बँकेची लिंक फेल असल्याने मंगळवारी दिवसभर या बँकेचे व्यवहार ठप्प होते. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, वयोवृद्ध नागरिकांचे ग्रामीण बँकेत खाते आहेत. ...
१३ व १४ आॅगस्ट रोजी धानोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धानोरा-रांगी मार्गावरील पुसावंडी गावाजवळचा अर्धा रस्ता खरडून गेला आहे. एक ते दीड फूट खोल खड्डा पडला आहे. वाहनधारकांना जीव धोक्यात घालून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. ...
वृक्ष लागवड करण्यासाठी आणलेल्या रोपट्यांपैकी बहुतांश रोपट्यांची लागवड ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे शेकडो रोपटे इल्लुर गावातील समाज मंदिराच्या परिसरात पडून आहेत. यातील काही रोपटे कोमेजली सुध्दा आहेत. ...
देसाईगंज पोलिसांनी सापळा रचून सुमारे ४ लाख ३२ हजार रुपयांची देशी दारू व २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना लागून आहेत. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री शासनाच्या केंद्रावर केली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. अनेक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत. ...
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी ...
एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून आपल्या स्थानिक मागण्यांसाठी सुरू केलेले बाजारपेठ बंदचे आंदोलन सोमवारीही सुरूच होते. काही वेळ चक्काजाम आंदोलनसुध्दा करण्यात आले. दरम्यान एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊ ...
सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील आलापल्लीजवळील भंबारा चौकात ट्रकने एसटीला धडक दिली. या धडकेत एसटी क्षतिग्रस्त झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर अपघात सोमवारी सकाळी ६.३० वाजता झाला. ...
यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...