हे गाव कटेझरीपासून पाच किमी अंतरावर आहे. मुरूमगाव-कटेझरीपर्यंत डांबरी रस्ता आहे. कटेझरीवरून मात्र या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात एकूण १७ घरे आहेत. लोकसंख्या १२० च्या जवळपास आहे. गावात जिल्हा परिषदेची शाळा असून पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत ...
नवीन उंच पूल बांधून देण्यासाठी गावकºयांनी यापूर्वी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन दिले आहे. तर प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास जीव मुठीत घालून पुलावरून प ...
यावर्षी आतापर्यंत पर्लकोटा नदीच्या पुलावर ७ वेळा पाणी चढले. याशिवाय दोन वेळा भामरागड शहरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. बहुतांश घरांची पडझड झाली आहे. घरातही पुराचे पाणी घुसल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले. ...
नागरिकांच्या मागणीनंतर यंदाच्या उन्हाळ्यात येथे मुरूमाऐवजी माती टाकण्यात आली. अतिवृष्टीमुळे टाकलेली माती पूर्णत: चिखलमय झाली. काही माती वाहून गेली. उन्हाळ्यात करण्यात आलेले सपाटीकरणाचे काम निकृष्ट होते, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. सध्या य ...
धानपिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. धानाच्या बुंध्यावर तुडतुड्याचे लक्षण दिसून येत आहे. सुकाडा भागातील काही शेतात धानपिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला. शेतकऱ्यांनी धानपिकाचे सूक्ष्म निरीक्षण करून उपाययोजना करावे, असे आवाहन कृषी विभा ...
वीज समस्येला घेऊन कोटगूल भागातील ४० वर नागरिकांनी कोटगूल येथील विद्युत विभागाच्या उपकेंद्र कार्यालयावर सोमवारी धडक दिली. दरम्यान उपअभियंता पवार यांना निवेदन देऊन सदर समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, कोटगूल भागातील वीज सेवा ...
राजघराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आत्राम घराण्याचे अहेरी मतदार संघावर आतापर्यंत वर्चस्व राहिले आहे. विद्यमान आमदार अम्ब्रिशराव हे सध्या या राजघराण्याच्या गादीचे वारसदार म्हणून विराजमान आहेत. गेल्यावेळी भाजपच्या तिकीटवर पहिल्यांदाच विधानसभा लढल्यानंतर ...
रेगडी जलाशय दिना नदीवर बांधण्यात आले आहे. सदर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर याचे पाणी दिना नदीत सोडले जाते. त्यामुळे ओव्हरफ्लो सुरू असताना दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढते. देवदावरून रेगडीला जाण्यासाठी दिना नदी ओलांडून जावे लागते. ...
पुराने ग्रस्त असलेल्या भामरागडवासीयांना जिल्हाभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. नागरिकांचे संरक्षण करण्याबरोबरच नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडविण्यास पुढाकार घेणाऱ्या सीआरपीएफने धानोरा येथील नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले. सीआरपीएफकडे सु ...
गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी सरासरी पावसाच्या सुमारे १३२ टक्के पाऊस पडला आहे. पाच ते सहा वेळा पूर आल्याने अनेकांचे पीक वाहून गेले आहे. इतरही पिकांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. अशा परिस्थितीत शासन गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करेल, अशी अप ...