पाेलिसांनी १५ लिटर साखरेची दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:51 IST2021-02-05T08:51:43+5:302021-02-05T08:51:43+5:30
सिराेंचा : तालुक्यातील अंकिसा माल येथे चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या दोघांकडून १५ लिटर दारू जप्त करीत गुन्हे दाखल ...

पाेलिसांनी १५ लिटर साखरेची दारू पकडली
सिराेंचा : तालुक्यातील अंकिसा माल येथे चोरट्या मार्गाने दारू विक्री करणाऱ्या दोघांकडून १५ लिटर दारू जप्त करीत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आसरअल्ली पोलीस व मुक्तिपथने संयुक्तरीत्या केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
अंकिसा येथे गाव संघटनाच्या परिश्रमामुळे दारूमुक्त गाव निर्माण झाले होते. अवैध दारू विक्री पूर्णतः बंद झाली होती. मात्र राघवरावनगर वाॅर्डातील काही दारू विकेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. याबाबतची माहिती आसरअल्ली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूला मिळताच तीन ठिकाणी धाड मारली. दरम्यान चिनका तुंमावार (६५) हिच्या घरी पाच लिटर साखरेची दारू तर मल्लका गोरा (६०) हिच्या घरी १० लिटर साखरेची दारू, अशी एकूण ३ हजार रुपये किमतीची दारू नष्ट करीत दोन्ही दारू विक्रेत्यांवर आसरअल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.